वॉलमार्टची ऑनलाईन होलसेल शॉप सुरू

wallmart
वॉलमार्ट इंडियाने मंगळवारी ऑनलाईन होलसेल सेवा भारतात सुरू केली असून हैद्राबाद आणि लखनौत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे होलसेल खरेदीदारांना ई कॉमर्स प्र्लटफॉर्म उपलब्ध झाला असून त्यांच्या अन्य शॉपप्रमाणेच येथेही सर्व उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय मेंबर साठी स्पेशल आयटेमही दिले जाणार असल्याचे वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष क्रिश अय्यर यांनी सांगितले.

ते म्हणाले की ही सेवा सुरू करण्यापूर्वी मेंबरसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात या सेवेचे फायदे तोटे, जागृती, नोंदणी करण्याच्या पद्धती यांची माहिती देण्यात आली. ही सेवा केवळ नेादणीकृत मेंबरसाठीच उपलब्ध आहे. सध्या वॉलमार्ट भारतात कॅश अॅन्ड कॅरी व्यवसायात असून त्यांनी ६ वर्षांपूर्वी भारती एंटरप्रायजेस बरोबर केलेली भागीदारी संपुष्टात आणून स्वतंत्र व्यवसायाचा निर्णय घेतला होता. वॉलमार्ट बेस्ट प्राईज या टॅगखाली २० होलसेल स्टोअर्स चालवित आहे.

Leave a Comment