मारियाचा निर्णायक गोलमुळे अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत

aergintina
साओ पावलो- मंगळवारी झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील लढतीत अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना अतिरिक्त वेळेत गेला. निर्धारीत ९० मिनिटामध्ये दोन्ही संघाकडून गोल न झाल्याने सामना जादा वेळ दिला गेला, परंतु जादा वेळेतही पहिल्या दहा मिनिटात गोल झाला नाही. अखेर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेसीने दिलेल्या सुरेख पासवर एंजल डी मारियाने जादा वेळेत ११८व्या मिनिटाला गोल करुन संघाला १-० आघाडी मिळवून दिली. हाच गोल अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन गेला.

उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना अमेरिका आणि बेल्जियम यांच्यातील विजेत्या संघाशी पाच जुलै रोजी होईल.

Leave a Comment