भारताला स्कवॅशमध्ये पदकाची आशा

deepika
नवी दिल्ली – ग्लासगोमध्ये येत्या २३ जुलैपासून सुरु होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे स्कवॅशपटू सौरभ घोषाल, दिपीका पल्लीकल यांना अनुक्रमे चौथे आणि सहावे सीडींग मिळाले आहे.

जागतिक स्कवॅश संघटनेने पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी या पाच प्रकारांसाठी सीडींग जाहीर केले आहे. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत स्कवॅशमध्ये पहिले पदक जिंकण्याची चांगली संधी आहे. जागतिक क्रमवारीत दिपीका १० व्या, घोषाला १६ व्या आणि जोसहाना चिनाप्पा २१ व्या स्थानावर आहे.

दिपीका पल्लीकल भारताकडून फक्त पहिल्या दहामध्ये आहे. एकेरीपेक्षा दुहेरीमध्ये भारताला पदक जिंकण्याची जास्त संधी आहे. मागच्या महिन्यात मलेशियामध्ये जेतेपद पटकवून घोषाल, पल्लीकल जोडीने आपल्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कौलाल्मपूरमध्ये पल्लीकलने चिनाप्पाच्या साथीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.

Leave a Comment