धक्कादायक; भारतात दररोज होत आहेत ९२ बलात्कार

rape
मुंबई – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार भारतात दररोज ९२ बलात्काराचे गुन्हे दाखल होता आहेत, तर याबाबती राजधानी दिल्लीत बलात्कार होण्याची संख्या सर्वात जास्त आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या आकड्यांनुसार २०१३ मध्ये एक लाख महिलांमागे १ हजार ६३६ महिलांना कथित बलात्काराचा सामना करावा लागला. तर एकट्या दिल्लीत ८७ लाख ८० हजार महिला असून, दिल्लीतील बलात्कार प्रमाण १८.६३ आहे.

२०१३ साली संपूर्ण भारतात ३३ हजार ७०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले, यात दिल्लीतील बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण ४.८५ टक्के होते. हे आकडे पोलिस स्टेशनमधील नोंदीवरून घेण्यात आले असून, बलात्काराची काही प्रकरणे पोलिस स्टेशनपर्यंत पोहचलीच नाही.

राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार मिझोरमचा नंबर दुसरा आहे. मिझोरममध्ये बलात्कार प्रकरणांचा दर १७.८ टक्के आहे. मिझोरममध्येही महिलांची संख्या २ लाख ९५ हजार आहे. बलात्कार प्रकरणात सिक्कीमचा तिसरा क्रमांक आहे. सिक्कीममध्ये एक लाख महिलांमागे बलात्कारचे प्रमाण १४.५८ आहे. काही वर्षापासून मध्य प्रदेशात बलात्कार प्रमाण वाढत होते. मात्र या वर्षी ४ हजार ३३५ प्रकरणे दाखल झाली आहेत. मध्य प्रदेशात 3 कोटी 58 लाख महिला आहेत. एक लाख महिलांमागे हे प्रमाण कमी आहे. मध्य प्रदेशात हे प्रमाण १२.११ आहे.

२०१२ मध्ये ब्युरोने नोंदवलेल्या आकड्यानुसार एक वर्ष आधी एक लाख महिलांमागे सर्वात जास्त बलात्काराचे प्रमाण हे मिझोरममध्ये होते. हे प्रमाण लाखामागे २०.८१ तर राजधानी दिल्लीत ८.२६ होते.

Leave a Comment