कॅमेरूनच्या फुटबॉलपटूंची मॅचफिक्सिंगप्रकरणी होणार चौकशी

camerun
गौरमांगी सिंहयाउंडे (कॅमेरून) – कॅमेरूनच्या सात फुटबॉलपटूंची मॅचफिक्सिंगच्या आरोपानंतर चौकशी केली जाणार असल्याचे कॅमेरून फुटबॉल असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये आमच्या काही फुटबॉलपटूंवर मॅचफिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आलेत. त्याची गंभीर दखल घेत आम्ही चौकशी करणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्या फुटबॉलपटूंवर कारवाई केली जाईल, असे असोसिएशनतर्फे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. गटवार साखळीतील तिन्ही लढतींमध्ये विशेष करून क्रोएशियाविरुद्धची कॅमेरूनची लढत ‘फिक्स’ होती, असे म्हटले जात आहे.

Leave a Comment