काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला!

ajit-pawar
पालघर – काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणूक फिफ्टी-फिफ्टीच्या फोर्म्युल्यावर लढवावी अशी मागणी करणार असल्याची माहिती पालघर येथील जाहीर शभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी लोकसभेतील दारूण पराभव नंतर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. तसेच आगामी विधान सभेच्या प्रचारासाठी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार यांनी पालघर या नवीन जिल्ह्यापासून प्रचारसभेला सुरवात केली.

ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पायमल्ली होत असून विधानसभेत ठाणे ग्रामीण मध्ये राष्ट्रवादीने २ जागांऐवजी ४ जागा लढवाव्यात अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. ज्या २ जागा आहेत त्या तरी अगोदर जिंका, मग ४ जागा देऊ असे खडेबोल अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना या सभेत सुनावले.

Leave a Comment