आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून बचावपट्टू योबोची निवृत्ती

yobo
ब्रासिलिया- नायजेरियाचा बचावपटू जोसेफ योबोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. नायजेरियातर्फे फ्रान्सविरुद्ध खेळताना ‘स्वयंगोल’ करणाऱ्या योबोच्या कारकीर्दीचा शेवट मात्र निराशाजनक झाला.

नॉकआउट फेरीत नायजेरियाने प्रथमच प्रवेश केल्याने आनंद झाला. मात्र पुढे वाटचाल न केल्याने निराशा झाली, असे योबोने सांगितले. योबाने आपल्या १३ वर्षाच्या कारकीर्दीत तीन वर्ल्डकप खेळले आहेत. तसेच सात आंतरराष्ट्रीय गोल केलेत. एक अनुभवी बचावपटू असलेल्या योबोने नायजेरियाचे कर्णधारपदही भूषवले. त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर नायजेरियाच्या ड्रेसिंगरूममधील वातावरण भावनिक झाले. योबोसारखा दुसरा सहकारी मिळणे कठीण आहे, असे त्याच्या सहका-यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीनंतर क्लब फुटबॉलमध्ये अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे तसेच कुटुंबीयांना अधिक वेळ देण्याचे योबोने ठरवले आहे. क्लबस्तरावर तो नॉर्विच सिटीचे प्रतिनिधित्व केले.

Leave a Comment