5 जुलैपासून आयटीआयची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया

online
मुंबई – राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमासाठी येत्या 5 जुलैपासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया कशी आणि कोणत्या विषयासाठी कसे प्रवेश अर्ज भरावे या संदर्भातील हे वेळापत्रक 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

दहावी आणि बारावीनंतर विविध औद्योगिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱयांची मोठी संख्या राज्यात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठय़ा संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडणारे नसते त्यामुळे मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआय चांगला पर्याय आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका, केंद्राची यादी आणि इतर माहिती www.dvet.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱया विविध महाविद्यालयातील एफवायच्या प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीची अखेरची मुदत २७ जूनपर्यंत होती. मात्र, आता ती २ जुलैपर्यंत करण्यात आली आहे.

Leave a Comment