सॅमसंगचे स्वस्त आणि मस्त अँड्रोईड किटकॅट फोन

samsung
नवी दिल्ली – सध्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत अँड्रोईड किटकॅट फोनची चलती आहे. आता या स्पर्धेत सॅमसंगही उडी घेत सॅमसंग अँड्रोईड किटकॅट प्रणालीवर आधारीत आपले चार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी कोर-२, सॅमसंग गॅलेक्सी स्टार २, सॅमसंग गॅलेक्सी एस ४ आणि सॅमसंग गॅलेक्सी यंग २ हे चार मोबाइल हँडसेट लाँच करणार आहे. हे चारही फोन अँड्रोईड किटकॅट ४.४ या आधुनिक ऑपरेटींग प्रणालीवर आधारीत असणार आहेत. सॅमसंगने याच्या किंमती जाहीर केल्या नसल्या तरी हे फोन बजेट फोन असणार आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी कोर २ – ४.५ इंच टीएफटी डिस्प्ले, १.२ गीगाहर्ट्ज क्वार्डकोर प्रोसेसर, ७६८ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज, एक्सपांडेबल मेमरी ६४ जीबी, ५ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रियर कॅमरा, वीजीए फ्रंट कॅमरा, २००० एमएएच बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एस ४ – सॅमसंग गॅलेक्सी एस ४ मध्ये एलटीई नेटवर्क आणि ३ जी नेटवर्क असे दोन वैरिएंट्स असणार आहेत. एलटीईसाठी १ जीबी रॅम तर ३जी साठी ५१२ रॅम असणार आहे. एलटीईत १.२ गीगाहर्ट्ज डुअल कोर प्रोसेसर तर ३ जी मध्ये१ गीगाहर्ट्ज डुअल कोर प्रोसेसर असणार आहे., ५ मेगापिक्सल रियर कॅमरा आणि व्हिडिओ कॉलींगसाठी वीजीए रेजल्यूशनचा फ्रंट कॅमरा, १८०० एमएएच बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी यंग २ – स्क्रीन ३.५ इंच, १ गीगाहर्ट्ज सिंगल कोर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, ४ जीबी इंटरनल स्टोरेज, ३ मेगापिक्सल कॅमेरा

Leave a Comment