लेडी डायनाच्या संपत्तीतून प्रिन्स हॅरीला १ कोटी पौंडचा वाटा

daina
लंडन – ब्रिटनचा राजपुत्र हॅरी याला त्याच्या वयाच्या ३0 व्या वर्षी त्याची दिवंगत आई प्रिन्सेस लेडी डायना हिच्या संपत्तीमधून १ कोटी पौंड(सुमारे १00 अब्ज रुपये) मिळणार आहेत.

लेडी डायनाचा १९९७ साली कार अपघातात मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी ती आपल्यामागे सुमारे १३0 कोटींची संपत्ती सोडून गेली होती. आता यामध्ये दुप्पट वाढ झाली असून विविध कंपन्यांचे समभाग, दागिने आणि प्रिन्स चार्ल्ससोबत झालेल्या घटस्फोटानंतर मिळालेले रोख १७ कोटी पौंड यांचा यात समावेश आहे. डायनाच्या मृत्यूपत्रानुसार तिची संपत्ती एका ट्रस्टच्या नावे करण्यात आली होती.

सध्या ब्रिटिश लष्करामध्ये कॅप्टन असलेल्या प्रिन्स हॅरीचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३९ लाख रुपये आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी तो ३0 वर्षांचा होत आहे. या दिवशी त्याला त्याची दिवंगत आई प्रिन्सेस डायना हिच्या संपत्तीतील सुमारे शंभर अब्ज रुपये मिळतील. हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम यालाही त्याच्या ३0 व्या वाढदिवसाला अशाच प्रकारे डायनाच्या संपत्तीतील वाटा मिळाला होता. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार सुमारे ४0 कोटी रुपये कराच्या रूपाने वजा होतील. मात्र हॅरीने जर काही रक्कम धर्मादाय संस्थांना दान दिली तर कर कपात ३६ कोटीपर्यंत खाली येऊ शकेल. मात्र शाही परिवारानुसार प्रिन्स हॅरी कर वाचविण्यासाठी कोणताही आडमार्ग वापरणार नाही.

Leave a Comment