भाजपवर होती अमेरिकन गुप्तचरांची ‘नजर’

watch
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या जागतिक हेरगिरीला जगाच्या चव्हाट्यावर मांडणा-या एडवर्ड स्नोडेनने एक भांडाफ़ोड आहे. अमेरिकन न्यायालयाने भारतात नुकताच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षासह जगातील अन्य काही राजकीय पक्षांवर ‘नजर’ ठेवण्यास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला (एन एस ए) परवानगी दिल्याचे उघड करणारी कागदपत्रे स्नोडेनने उजेडात आणली आहेत.

याबाबत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. भाजपप्रमाणेच पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टी इजिप्तमधील मुस्लीम ब्रदरहूड या पक्षांच्या हालचालीबाबत हेरगिरी करण्यास अमेरिकन न्यायालयाने एन एस एला परवानगी दिली होती; असे स्नोडेनने उघड केलेल्या कागदपत्रांवरून आहे. त्याचप्रमाणे विदेशातील गुप्तवार्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने या राजकीय पक्षांबरोबरच १९३ देशांची सरकारे, राजकीय पक्ष, संस्था आणि व्यक्ती यांच्यावर अमेरिकन गुप्तवार्ता संकलन कायद्यानुसार एन एस ए नजर ठेऊ शकते; असे न्यायालयाने या कागदपत्रात नमूद केले आहे. जागतिक बेंक, आंतरराष्ट्रीय निधी, युरोपियन युनियन आणि आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोग यांच्यावरही ही गुप्तचर संघटना नजर ठेऊ शकते. मात्र ब्रिटन, केनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांमध्ये हेरगिरी करण्यापासून मात्र एन एस ए ला रोखण्यात आले आहे.

Leave a Comment