पुरुष वाढत्या वयातही प्रजननक्षम

baby
स्त्रीयांची प्रजनन क्षमता वाढत्या वयानुसार कमी होत जाते, परंतु पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा परिणाम फारसा होत नाही असे लंडनमधल्या काही डॉक्टरांच्या संशोधनात आढळून आले आहे. कृत्रिम गर्भधारणा केंद्रातील उपचारांमध्ये आढळून आलेल्या यशापयशाच्या प्रमाणावर स्त्रियांच्या वयाचा परिणाम झालेला दिसून आला. परंतु शुक्रबीज दान करणार्‍या पुरुषांच्या वयाचा या प्रमाणावर काही परिणाम होत नसतो असे आढळले.

कृत्रिम प्रजननाच्या सुमारे २ लाख ३० हजार प्रयोगात आलेले यश, प्रयोगात गुंतलेल्या स्त्रीचे वय आणि वीर्यदान करणार्‍या पुरुषाचे वय या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे दिसून आले की, १८ ते ३४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये प्रजनन क्षमता जोरदार असते. ३५ वर्षानंतर कृत्रिम उपायांनी मूल होण्याची त्यांची शक्यता कमी कमी होत जाते. पण पुरुषांच्या बाबतीत असे घडत नाही.

२० वर्षे वयाच्या आतील तरुणांचे शुक्रबीज पुरेसे प्रजननक्षम नसते, पण २० वर्षानंतर ४५ वर्षांपर्यंतच्या पुरुषांच्या शुक्रबीजात कसलाही फरक पडत नाही. या प्रयोगांमध्ये साधारणत: ४५ वर्षानंतरच्या पुरुषांचे शुक्रबीज वापरले जात नाही. परंतु ४५ वर्षानंतरही शुक्रबीजांची क्षमता तीच असते. या प्रयोगांमध्ये वापरण्यात आलेल्या २० ते ४५ या वयोगटातील पुरुषांच्या शुक्रबीजांमध्ये परिणामांच्या दृष्टीने काहीही फरक नसतो असे दिसून आले. एकंदरीत मूल होण्याच्या बाबतीत स्त्रीचे वय हे महत्वाचे असते, तितके पुरुषाचे महत्वाचे नसते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment