पंजाबमध्ये रंगणार ८८वे मराठी साहित्य संमेलन

sahitya-sammelan
मुंबई – पंजाबमध्ये ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेकडे यंदा आठ ते दहा ठिकाणाहून निमंत्रणे आली होती. यामध्ये बडोदा व घुमान या दोन ठिकाणांचा समावेश होता. परिषदेने यापैकी घुमानवर शिक्कामोर्तब केले आहे. संत नामदेव यांची पंजाबमधील घुमान ही कर्मभूमी असून, यंदा येथे मराठी साहित्याचा आवाज दुमदुमणार असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांनी सांगितले.

मराठीचा प्रसार संत नामदेवांनी पंजाबमध्ये केला आणि नामदेव व मराठी पंजाबी लोकांना आपलेसे वाटायला लागले याची आठवण करून देत नहार यांनी मराठी समाजालाही घुमान आपले वाटायला लागेल अशी आशा व्यक्त केली. फतेहगड साहिबजवळच्या बास्सी पाथना या शहरामध्ये संत नामदेव मंदीर असून त्यात नामदेवांची मूर्ती आहे.

Leave a Comment