चीन भारतात स्थापणार चार औद्योगिक पार्क

china
बिजिंग – भारत आणि चीनमध्ये भारतात चार ठिकाणी चीनने औद्योगिक पार्क स्थापण्यासंबंधीच्या कराराला अंतिम स्वरूप दिले असून त्या करारावर नुकत्याच स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. भारतात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांची बैठक प्रथमच झाली असून त्यात या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्याचे चीनच्या दौर्‍यावर असलेल्या वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे. सीतारमण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी याच्यासोबत चीन दौर्‍यावर गेल्या आहेत.

सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यात आणि चीनचे वाणिज्य मंत्री गाओ हुचेंग यांच्यात चर्चा झाली आहे. भारतीय वस्तू आणि सेवा चीनच्या बाजारात अधिक प्रमाणात आणण्यास चीनने मान्यता दर्शविली आहे. त्याचबरेाबर या दोन्ही देशातील व्यापारात होत असलेले ३५ अब्ज डॉलर्सचे नुकसान कमी करण्यासंबंधीही चर्चा झाली आहे. त्यानुसार चीनी कंपन्यांना भारताच्या चार वेगळ्या राज्यात चार औद्योगिक पार्क उभारण्याची मान्यता दिली गेली आहे. यामुळे चीनची भारतातील गुंतवणुक वाढणार आहे तसेच व्यापार तूट कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

Leave a Comment