… आणि फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत

france
ब्राझिलिया – सोमवारी झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीत सामन्यात फ्रान्सने नायजेरियावर २-० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये फ्रान्सच्या पॉल पोग्बा याने गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फ्रान्सच्या आघाडीत नायजेरियाच्या स्वयंगोलमुळे वाढ झाली आणि त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

नायजेरियाचा संघ गटवार साखळी सामन्यात एक विजय मिळवून बाद फेरीत झाला होता, पण नायजेरिया धक्कादायक निकाल नोंदवणार का याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र इतिहास फ्रान्सच्या बाजूने होता. त्यांनी आजवर जेव्हा जेव्हा गटवार साखळी सामन्याचा अडथळा पार केला आहे. तेव्हा त्यांनी किमान उपांत्य फेरी गाठली आहे. हा इतिहास कायम ठेवत त्यांनी आपले स्पर्धेतील वाटचाल कामय ठेवली आहे.

दोन्ही संघांना सामन्याच्या पहिल्या सत्रात गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळेच फ्रान्स आणि नाजयेरिया या दोन्ही संघांनी दुस-या सत्रात आक्रमक खेळी केल्या. गोल करण्याचे फ्रान्सने जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर ७९व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या पासवर पॉल पोग्बाने गोल करुन फ्रान्सला १-० अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. सामना संपन्यासाठी केवळ ११ मिनिटे शिल्लक असताना केलेल्या या गोलमुळे विजयासाठी फ्रान्सला केवळ चेंडू स्वतःकडे ठेवण्याचे काम करायचे होते. त्याच ९२व्या मिनिटाला नायजेरियाच्या जोसेफ योबोने स्वयंगोल करत फ्रान्सला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली आणि २-० गोल फरकाने फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Leave a Comment