अबू बकर अल बगदादी खलिफा म्हणून घोषित

erak
इराक आणि सिरीयाचा जो भाग आयएसआयएस या संघटनेने ताब्यात घेतला आहे तो खिलाफत म्हणजे इस्लामी राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला असून अबू बकरअल बगदादी याची मुस्लीम नेता म्हणजे खलिफा म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे जाहीर केले गेले आहे. आयएसआयएस या जिहादी संघटनेचे हे दीर्घकाळचे स्वप्न या घोषणेने प्रत्यक्षात उतरले असल्याचे मानले जात आहे. या संबंधीचा एक व्हीडीओ इंटरनेटवरून प्रसारीत करण्यात आला आहे.

यात नमूद केल्याप्रमाणे उत्तर सिरीयातील अलेप्पो पासून ते पूर्व इराकमधील दियाला पर्यंतचा टापू इस्लामी राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला आहे. आणि या राष्ट्राचा नेता म्हणून अबू बकरची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे त्याला खलिफा इब्राहिम म्हणून ओळखले जाणार आहे तसेच आयएसआयएसचे नांवही आता केवळ इस्लामिक स्टेट असे करण्यात आले आहे.

इराकी सेनेने या संघटनेच्या ताब्यातील तिक्रीत येथे पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी आक्रमणांचा दौर कायम राखला असून त्यात रशियन लढावू विमानांचे सहाय्य घेतले जात आहे. या भागात ही विमाने सतत बॉम्ब वर्षाव करत आहेत.११ जूनला या भागाचा ताबा इस्लामी संघटनेने घेतला आहे.

Leave a Comment