अनागोंदीचा कळस ;मृत्यूला ४७ वर्ष उलटल्यानंतर अटक करण्याची नोटीस

arrest
कराची – पाकिस्तानच्या पाणी खात्याचा अजब कारभार उघडकीस आला आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहोम्मद अली जीना यांच्या भगिनी फातिमा जीना यांच्या मृत्यूला ४७ वर्ष उलटल्यानंतर कराचीच्या पाणी खात्याने त्यांच्या नावे दोन लाख ६३ हजार ७७४ रुपयांचे पाणी बिल पाठवले आहे . विशेष म्हणजे दहा दिवसांची मुदत देताना अटक करण्याचा इशाराही दिला आहे, हे विशेष !

जीना यांनी मार्च १९४४ मध्ये एक लाख पंधरा हजार रुपयांना हे घर खरेदी केले होते.सप्टेंबर १९४८ मध्ये फातिमा यांनी या घरात राहण्यास सुरुवात केली. १९६५ पर्यंत त्या तेथे रहात होत्या. १९६५ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी ते घर रिकामे केले. १९६७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.असे असताना कराचीच्या पाणी खात्याने फातिमा जीना यांच्या नावे दोन लाख ६३ हजार ७७४ रुपयांचे पाणी बिल पाठवले आहे. दहा दिवसाच्या आत ही रक्कम भरा अन्यथा तुमचे पाणी तोडण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. पाणी बिल भरले नाही तर, जमिन महसूल कायद्यानुसार मालमत्ता जप्त करुन, लिलाव केला जाईल. असे म्हणणारे कराची पाणी खाते एवढयावरच थांबलेले नाही तर, तुम्हाला अटकही करु असे त्यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.नोटीसनुसार पाणी बिल भरण्याची शेवटची तारीख २८ मे होती. कराचीच्या आयुक्तांनी कराची पाणी खात्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना फातिमा जीना यांच्या नावे पाठवलेली नोटीस मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment