हेल्मेट वापरा अन्यथा पासपोर्ट नाही

helmet
पुणे – बेशिस्त वाहतुकीला आळा घालताना सुरक्षिततेसाठी पुणे पोलिस आयुक्तांनी आता कडक धोरण अवलंबिले आहे,वास्तविक तरुण वर्ग मोठ्याप्रमाणावर दुचाकी वापरत असले तरी सुरक्षिततेकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिस आयुक्तांनी हेल्मेटसाठी थेट पासपोर्ट या महत्वाच्या विषयाला हात घातला आहे,त्यामुळे आयुक्तांची ही मात्रा कितपत लागू पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाहतूक शाखेत शहरातील ५० रोटरी क्लब आणि २८ रोटरॅक्ट क्लब यांच्यावतीने हेल्मेट व रस्ता सुरक्षा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावेळी आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरुपात हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

यावेळी माथूर यांनी हेल्मेट सक्तीची पुन्हा री ओढली तसेच हेल्मेट घालण्याचे आवाहनही केले.हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांची माहिती विशेष शाखेच्या परकीय नोंदणी शाखेला देण्यात येईल. तसेच पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना व्हेरिफिकेशनसाठी ना-हरकत प्रमाणपत्र पाठवायचे की नाही, हे ठरवण्यात येईल, असे आयुक्त माथुर यांनी जाहीर केले आहे. हेल्मेट सक्तीला शहरवासियांकडून विरोध होत असताना आयुक्तांनी सक्तीची भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment