सार्वजनिक स्थळी तंबाखू खाण्यावर बंदी

tobacco
मुंबई – केंद्र व राज्यसरकारने तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी दुरदर्शन तसेच अनेक ठिकाणी जाहिरात प्रसारीत केल्या आहे. पान, तंबाखू, गुटखा यासारख्या अमली सेवनामुळे कँन्सर, टिबी, यासारखे भयानक आजार होऊन शेवटी मृत्यूलाच बळी पडावे लागते. असे सांगूनही या सेवनाचे प्रमाण काही कमी झाले नाही. सरकारने शेवटी तंबाखूवरील कर वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणे, शासकीय रूग्णालय, नगर पालिका, बस स्टॉप, विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाल्ला किंवा धुम्रपान केले तर राज्याच्या आरोग्य विभागाने थेट दंड ठोठावला जाणार आहे. १ऑगस्टपासून ही बंदी राज्यात लागू करण्यात येणार असून अशाप्रकारे बंदी घालणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे.

तंबाखूवरील कर वाढविण्यावर टाटा रूग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी भर दिला आहे. त्यांच्या मते तंबाखूवर ६५ टक्के कर केला तर तंबाखू खाण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल व दरवर्षी १५ लाख लोकांचे प्राण वाचतील. जर १०० टक्क्यांनी हा कर वाढविला तर २७ लाख लोकांचे प्राण वाचतील. असे डॉ. चतुर्वेदी यांचे मत आहे. काही दिवसापूर्वी तंबाखूवर नविन कर आकारला जाणार होता. तो कर ‘पाप कर’ म्हणून ओळखल्या जाणार होता मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.

Leave a Comment