मुंबई – पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विद्यमान ४८ आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या विभागीय बैठकीत ठाकरे यांनी केली.
शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना लागली लॉटरी!
ठाकरे यांनी सर्व आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचुन आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सुचनाही केल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील यशाने हुरूळून जाऊ नका, तो एक फुगा होता. त्यावर विसंबून रहाल तर हवेत विरून जाल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजप वगळता आपल्या शेजारच्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा, याबाबत सुचना करण्यासही ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. आपली उमेदवारी निश्चित झाल्याने शिवसेना आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.