वायूसेनेचा इस्त्रायलच्या गाजापट्टीवर बॉम्ब हल्ला

isreal
जेरूसलेम – गाजापट्टीतील हमास आणि इस्लामी दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या विविध ३४ ठिकाणांवर इस्त्रायलच्या वायूसेनेने जोरदार बॉम्ब हल्ले केले. गाजापट्टीतील चार नागरिक या बॉम्ब हल्ल्यात जखमी झाले, तर एक जण बेपत्ता झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या वायुसेनेने हे हल्ले हमासकडून दक्षिण इस्त्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केले. यापूर्वी दहशतवाद्यांनी यहुदी धार्मिक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. १८ दिवसांनंतर सोमवारी या विद्यार्थ्यांचे मृतदेह जॉर्डन नदीच्या पश्चिम तीरावर आढळून आले. या कृत्याला जबाबदार आलेल्या इस्लामी दहशतवाद्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांनी दिला आहे.

Leave a Comment