मॅच फिक्सिंग प्रकरणी लू व्हिनसेंटवर आजीवन बंदी

lou-vincent
ऑकलंड – मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लू व्हिनसेंटने दिल्यामुळे त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.

मंगळवारी एक निवेदन प्रसिध्द करुन, मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली व्हिनसेंटने दिली. माझे नाव लू व्हिनसेंट आहे आणि मी फसवणूक केली आहे.

सामने निश्चित करण्यासाठी अनेकदा पैसे घेऊन मी व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून माझ्या पदाचा गैरवापर केला. मी माझ्या देशावासियांचा, खेळाचा आणि निकटवर्तीयांचा विश्वासघात केला आहे. लू व्हिनसेंटने न्यूझीलंडचे २३ कसोटी आणि १०२ एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले.

Leave a Comment