गूगल करणार ऑर्कुटला साईनआउट

orkut
मुंबई – गूगल सोशल नेटवर्किंग साईट ऑर्कुट बंद करणार आहे. गूगल आपले सर्व लक्ष यू-ट्यूब, ब्लॉगर आणि गूगल प्लस या सेवांवर केंद्रित करणार आहे. गूगलने सांगितले की या सेवा जास्त लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे आपले लक्ष ते त्यावर केंद्रित करणार आहेत.

10 वर्षांपूर्वी सुरू झालेले ऑर्कुट सप्टेंबर महिन्यात बंद होईल, गूगलचे इंजिनियरिंग निर्देशक पॉल गोलघर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय, ‘मागील 10 वर्षांमध्ये यू-ट्यूब, ब्लॉगर आणि गूगल प्लस जास्त लोकप्रिय झाले आहेत.’

Leave a Comment