अनोळखी कॉलरची माहिती देणारी अॅप

caller
आपल्या फोनवर अनेकदा अनोळखी नंबरवरून कॉल येतात. बरेचदा असे कॉल युजरला त्रास देण्यासाठीही येत असतात. मात्र आता अशा कॉलची चिंता करण्याचे कारण राहिलेले नाही. असे कॉल आलेच तर संबंधित नंबरची सर्व माहिती आपल्या फोनवरूनच आपल्याला देणारी अनेक अॅप बाजारात आलेली आहेत आणि युजर त्याचा यशस्वी उपयोगही करून घेत आहेत. अँड्राईड व आयओएस सिस्टीमवर चालणारी कांही उपयुक्त अॅप अशी-

मोबाईल नंबर लोकेटर – भारत, अमेरिका आणि कॅनडा या झोनमध्ये हे अॅप चालू शकते. आपल्या मोबाईल वर कॉल आला की तो कुठून आला, हा नंबर कोणाचा याची सर्व माहिती युजरला मिळते. या अॅपला गुगल थ्रीडी मॅप सुविधा असल्याने कॉल करणार्‍याचे ठिकाण समजू शकते. विना इंटरनेटही हे अॅप काम करते आणि इनकमिंग किवा आऊट गोईंग कॉल सुरू असतानाही ही माहिती युजरला मिळू शकते.

ट्रू कॉलर- हे अॅप तयार करणार्‍यांनी त्यांच्याकडे प्रचंड मोठा मोबाईल डेटाबेस असल्याचा दावा केला आहे. जगभरातील कोणत्याही देशातील फोन नंबर कॉल लिस्ट अपडेट करण्यास हे अॅप मदत करते तसेच फोन घेण्यापूर्वीच कुणी कॉल केला त्याची सर्व माहिती युजरला मिळते. नको असलेले नंबर ब्लॉक करण्याची सुविधाही यात दिली गेली आहे. हे अॅप आत्तापर्यंत १० लाख युजरनी डाऊनलोड केले आहे.

लाईन हुज कॉल -लाईन कार्पोरेशनचे हे अॅप कॉल डिटेल्स देते तसेच अनोळखी नंबरवरून युजरला त्रास दिला जात असेल तर ते नंबर ब्लॉकही करते. कॉल येताच कॉल करणार्‍याची सर्व माहिती युजरला मिळतेच पण यावर नको असलेले एसएमएसही ब्लॉक करता येतात.यात ६० कोटी फोन नंबर सेव्ह केलेले आहेत असाही दावा केला जात आहे.

कॉल्स ब्लॉक लिस्ट – या अॅपमुळे आपल्याला कॉल येऊ नये असे वाटणारे नंबर तसेच एसएमएस ब्लॉक केले जातात. हे अॅप अगदी छोटे असून मेमरीची खूपच कमी जागा त्याला लागते. टॉक साईड- या अॅपमुळे केवळ येणार्‍या फोनसंबंधी सर्वच माहिती मिळते असे नाही तर सोशल मिडिया नेटवर्कवरील संबंधित फोन कर्त्यांची सर्व माहितीही युजरला मिळते. फोन करणार्‍याचा फोटोही युजरला दिसतो.

Leave a Comment