अंतिम सोळात जपानचा निशिकोरी

nishikori
लंडन – जपानच्या केई निशिकोरी याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अंतिम १६ स्पर्धकात प्रवेश केला आहे.

जबरदस्त रंगलेल्या लढतीत इटलीच्या सायमन बोलेल्लीचा दहावा सिडेड निशिकोरी याने ३-६, ६-३, ४-६, ७-६ आणि ६-४ ने पराभव केला. दोन दिवसांपूर्वी यांच्यातील लढत पावसाच्या व्यत्ययामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही खेळाडू अंतिम सेटमध्ये ३-३ गेम्सने बरोबरीत होते. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांच्यात शेष लढत झाली. उपउपांत्यपूर्व फेरीत निशिकोरीचा सामना कॅनडाच्या मिलोस रावनिक याचेशी होणार आहे.

अन्य सामन्यात पाचवा सिडेड आणि ऑस्ट्रेलियन विजेता वावरिंका याने अंतिम १६ स्पर्धकात धडक दिली आहे. त्याने उजबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिन याच्यावर ६-३, ६-३, ६-४ ने मात केली. २००९ मध्ये वावरिंका चौथ्या फेरीपर्यंत पोचला होता.

Leave a Comment