रोमहर्षक लढतीत हॉलंड विजयी

holland

फोर्टलिजा – विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरीतील लढत रोमहर्षक ठरत आहेत. या स्पधेतील मेक्सीको विरूध्दर हॉलंड सामनाही शेटवटपर्यंत रोमहर्षक ठरला या सामन्यात शेवटच्या‍क्षणी गोल करीत बरोबरीत असलेल्या सामन्यात २-१ ने विजय मिळविला.

या सामन्यात सुरुवातीपासून ८७ व्या मिनिटांपर्यंत आघाडीवर असलेल्या मेक्सिकोला हॉलंडने हरवून सनसनाटी विजयाची नोंद करत प्री-क्वार्टरमध्ये स्थान मिळवले. ८७ व्या मिनिटापर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या मेक्सिकोचा संघ विजयाच्या अगदी समीप होता आणि त्यांचे सर्मथक मैदानात जल्लोष करत होते. मात्र, ८८ व्या मिनिटाला हॉलंडचा स्ट्रायकर स्नायडरने शानदार गोल करत सामना बरोबरीत आणून सोडला. याच्या चार मिनिटांनंतर माक्र्विजच्या फाऊलवर हॉलंडला पेनल्टी मिळाली आणि हीच पेनल्टी निर्णायक ठरली. हॉलंडचा बदली खेळाडू हंटेलारने इंज्युरी टाइममध्ये मिळालेली ही पेनल्टी गोलमध्ये परावर्तित करण्यात कोणतीच चूक केली नाही. या गोलमुळे हॉलंडने २-१ अशा फरकाने विजय नोंदवत क्वार्टर फायनलची जागा निश्चित केली.

या सामन्यात मेक्सिकोने हॉलंडला तगडी टक्कर दिली. एकवेळ त्यांचा विजय दृष्टिपथातही होता. मात्र, हंटेलारने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. दोन्ही संघांतील आक्रमक संघर्षानंतरही पहिल्या हाफमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. दुसर्याे हाफचा खेळ सुरू होताच सांतोसने ४८ व्या मिनिटाला शानदार गोल करत मेक्सिकोला १-० ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भरून काढण्यासाठी हॉलंडने अनेक प्रयत्न केले. मात्र, मेक्सिकोचा गोलकीपर ओचाओने त्यांना यश मिळू दिले नाही.

Leave a Comment