महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांची तपासणी होणार- स्मृती इराणी

smriti
मुंबई- महाराष्ट्रातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयात नियमांचे उल्लंघन तसेच अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी करण्याचे आदेश मानवसंसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी दिले आहेत. राज्यात ३६५ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षात परवानगी दिल्या गेलेल्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महाविद्यालयांसाठी बंधनकारक असलेल्या सोयीसुविधा केवळ कागदावरच आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग नसणे, प्रोफसर पदे रिक्त असणे मात्र तरीही सर्व पदे भरल्याची माहिती देणे, बंधनकारक असलेल्या अडीच एकर जागेपेक्षा कमी जागेत महविद्यालय चालविणे, अभियांत्रिकीऐवजी पॉलिटेक्नीक, एमबीएचे अभ्यासक्रम घेणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. राज्यातील ७ महाविद्यालयातच ४०० पदे रिक्त आहेत. या सर्व प्रकारांची गंभीर दखल केंद्रीय मानवसंसाधन विभागाने घेतली असून महाविद्यालयांची तपासणी करण्याचे तसेच या महाविद्यालयांना परवानगी देणार्‍या अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश इराणी यांनी दिले आहेत.

भाजपचे माजी विधानपरिषद सदस्य संजय केळकर यांनी या संदर्भात पुरावे म्हणून आवश्यक कागदपत्रे केंद्रीय मानव संसाधन विभागाकडे सोपविली असल्याचेही समजजे. महाविद्यालयांना परवानगी देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनीही २३ महाविद्यालांना मान्यता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment