फ्रान्स –जर्मनी येणार आमने सामने

fransa

ब्रासिलिया/पोट्रो अॅलेग्रे- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत ब-याच रंगतदार लढती पाहवयास मिळाल्या आहेत. उपांत्य्पूर्व फेरी अगोदरच अव्वबल संघात सामना होत असल्याने या लढती रोमहर्षक ठरत आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फ्रान्स आणि जर्मनी हे माजी वर्ल्डकप विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येतात का हे आता सोमवारच्या लढतीनंतर समजणार आहे.

फ्रान्सची दुस-या फेरीतील लढत नायजेरियाशी ब्रासिलियात होईल. पोट्रो अॅलॅग्रेमध्ये जर्मनी अल्जीरियाशी दोन हात करेल. या लढतीच्या निमित्ताने १९८२ वर्ल्डकपमधील आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी गटवार साखळीत अल्जीरियाने तेव्हाच्या वेस्ट जर्मनीला नमवले होते. ते पाहता या दोन लढतींची पर्वणी सोमवारी फुटबॉलप्रेमींना अनुभवता येईल.

फ्रान्सच्यादृष्टीने जमेची बाजू म्हणजे त्यांनी वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत जेव्हा गटवार साखळीचा अडथळा पार केला आहे तेव्हा त्यांनी किमान उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र त्याच वेळी त्यांना त्यांच्यापेक्षा रॅँकिंगने कमी असणा-या नायजेरियाला कमी लेखता येणार नाही. कारण नायजेरियाने गटवार साखळीत एकच विजय नोंदवला असला तरी त्यांनी मेसीच्या अर्जेटिनाला विजयासाठी झुंजवले होते.फ्रान्सने गटवार साखळीत पहिल्या दोन लढतींमध्ये होंडुरास आणि स्वित्झर्लंडलडविरुद्ध मोठे विजय नोंदवले असले तरी त्यांना इक्वेडोरविरुद्ध आश्चर्यकारक बरोबरी स्वीकारावी लागली होती. ते पाहता त्यांना निर्धास्त राहून चालणार नाही. याउलट नायजेरिया वर्ल्डकपमध्ये कधीही उपांत्यपूर्व फेरी गाठू शकलेला नाही. त्यातच १९९८ वर्ल्डकपनंतर प्रथमच ते बाद फेरीची लढत खेळणार आहेत.

जर्मनी आणि अल्जीरियात होणारी दिवसातील दुसरी लढत रंगतदार ठरू शकते. जर्मन संघ विजयासाठी दावेदार मानला जात असला तरी अल्जीरिया सामन्यागणिक खेळ उंचावत आहे. त्यातच आकडेवारीवर नजर टाकली तर जर्मनीने आतापर्यंत अल्जीरियाविरुद्ध खेळलेल्या दोन्ही लढती गमावल्या आहेत. हेडरद्वारे गोल करण्यात अल्जीरियाचा हातखंडा दिसतो. याउलट जर्मनीला घानाविरुद्धची बरोबरी वगळता स्पर्धेत यश लाभले आहेत.चार गोल करणारा थॉमस म्युलरवर त्यांची भिस्त असली तरी मिरोस्लाव क्लोसाच्या विक्रमाकडे सर्वाच्या नजरा आहेत.

Leave a Comment