पेनल्टी शूटआऊटमध्ये कोस्टारिका विजयी

coastarica

ब्रासिलिया- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कोस्टारिका व ग्रीस संघातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यावनंतरही वाढवून देण्याथत आलेल्या वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात यश आले नाही. त्यानंतर या सामन्याचा निर्णय पेनल्टील शूटआऊटच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये कोस्टाारिका संघाने ५-३ अशी बाजी मारत ग्रीसला धूळ चारली.

दोन्ही संघादरम्यनचा हा सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेनंतरही १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटपर्यंत सामना लांबला गेला. यामध्ये कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवासने उत्तम बचाव केला, तर दुसऱया बाजूला ग्रीसच्या गोलरक्षक बचावात सपशेल फोल ठरला. कोस्टा रिकाने एकही संधी न गमावता पेनल्टी शूटआऊटमध्ये पाच गोल नोंदविले, तर ग्रीसला केवळ तीन गोल नोंदविता आले. कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवास विजयाचा शिल्पकार ठरला.

सामन्यात ब्रायन रुईजने ५२ व्या मिनिटाला गोल करत कोस्टा रिकाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर ९१ व्या मिनिटाला ग्रीसच्या पापास्थाथॉपुलोसने शानदार गोल करत बरोबरी साधून दिली होती. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले आणि यामध्ये कोस्टा रिकाने बाजी मारली.

Leave a Comment