पाक नागरिकांना श्रीलंकेचा व्हीसा नाही

pass
श्रीलंका – भारताला निशाणा बनविलेल्या पाकमधील जिहादी गट भारतात प्रवेश करण्यासाठी श्रीलंकेच्या भूमीचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने श्रीलंकेने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली असल्याचे समजते. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याबरोबर झालेल्या प्रथम भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा मांडला होता. त्याची गंभीर दखल घेऊन राजपक्षे यांनी चौकशी आणि तपासाचे आदेश दिले होते. त्यात पाक जिहादी भारतात घुसरण्यासाठी श्रीलंका आणि मालदीवच्या भूमीचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे समजते.

चेन्नईत मे महिन्यात झालेल्या स्फोटात याच जिहादींचा हात होता.मलेशियासह एका बहुराष्ट्रीय तपास यंत्रणेने या स्फोटाच्या केलेल्या तपासात सापडलेला संशयित शाकीर हुसेन याने भारतात हल्ले करण्याच्या जागांची रेकी करण्यासाठी २० वेळा श्रीलंकेतून घुसल्याची कबुली दिली आहे. बंगलोर व चेन्नई स्फोट घडविणार्‍या अतिरेक्यांना मालदीवमधून आपणच शस्त्रे व स्फोट सामग्री पुरविल्याचेही त्याने कबूल केले आहे. बंगलोर व चेन्नई येथील अमेरिकी दूतावास व इस्त्राईल दूतावासावर झालेल्या हल्ल्यांमागे हेच जिहादी गट आहेत असेही त्याने कबूल केले आहे.

या अहवालांची दखल घेऊन पाक नागरिकांना श्रीलंकेचा व्हीसा यापुढे दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्रीलंकेकडून घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment