ख्रिस गेलला टी-२० मालिकेसाठी विश्रांती

chris-gayle
बार्बोडोस – तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलला न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार्‍या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. डोमिनिका येथील विंडसरपार्क मैदानावर पाच आणि सहा जुलै रोजी दोन लढती रंगणार आहेत. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत गेलला पाठीच्या दुखण्याने हैराण केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विंडीज क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

तसेच आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा ड्वेन ब्राव्हो देखील दुखापतीतून सावरला नसल्याकारणाने त्याचा देखील या संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वेस्ट इंडीज संघाला २०१२ साली विश्‍वचषक मिळवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी सर रिची रिचर्डसन यांची संघ व्यवस्थापकपदी आणि ओटीस गिब्सन यांची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी विंडीज क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली आहे.

विंडीज संघ : डॅरेन सॅमी (कर्णधार), लेंडी सिमन्स, ड्वेन स्मिथ, ऍण्ड्री फ्लेचर, डॅरेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, रसेल, ख्रिस्तोफर बार्नवेल, दिनेश रामदीन, ख्रिशमर संटोकी, सुनील नरेन, शेल्डॉन कोट्रेल आणि सॅम्युअल बद्री.

Leave a Comment