खुशखबर!! राज्यातल्या ४४ टोलनाक्याना उद्यापासून टाळे

toll
नाशिक – ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुहूर्त सापडला असून, तो निर्णय आता प्रत्यक्ष अमलात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. त्याचबरोबर यापुढे एसटीला कोणताही टोल भरण्याची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्य सरकारचा राज्यातील टोलनाके रद्द करण्याचा निर्णय केव्हा अमलात येईल ह्याची प्रतीक्षा सर्वांच होती. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारकडून प्रसिध्द होईपर्यंत टोल चालकांनी टोल आकारणी सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली होती. अखेर टोल चालकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दि. 1 जलै म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच एसटी महामंडळाला दिलासा देत यापुढे राज्यात एसटीला कोणताही टोल भरण्याची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एसटी बसेसला सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीच्या सर्व टोलनाक्यांवर टोल द्यावा लागणार नाही.

Leave a Comment