इराकच्या ताफ्यात जेट लढाऊ विमाने

jet
बगदाद ;सुन्नी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाकडून मागविलेली पाच जेट लढाऊ विमाने इराकला शनिवारी मिळाली. लवकरच ही विमाने वायुसेनेत दाखल होणार आहेत.

गेल्या तीन आठवडय़ांपासून आयएसआयएस या सुन्नी दहशतवाद्यांनी इराकच्या अनेक भागात हल्ले करून प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. उत्तर-पश्चिम भागात दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी इराकला या लढाऊ विमानांची गरज होती. त्यासाठी इराकने रशियाकडे या विमानांची मागणी केली होती. शनिवारी पहिल्या खेपेत पाच जुनी जेट लढाऊ विमाने इराकमध्ये दाखल झाली. उर्वरित दहा विमानेही लवकरच इराकला पोहचणार आहेत. पाच अरब डॉलरमध्ये हा सौदा ठरला. या लढाऊ विमानांमुळे इराकच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होणार असून, दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यास लष्कराला लवकरच यश येईल, असा विश्वास इराकचे पंतप्रधान नूरी मलिकी यांनी व्यक्त केला आहे.

भारतीयांच्या सुटकेसाठी सरकार सरसावले
दरम्यान ,इराकमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, त्यांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे. इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या शहरांमध्ये जवळपास 100 भारतीय अडकले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली आहे. लष्करासोबतच नौदलाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता असून, पारसच्या ख्घडीत नौदलाच्या दोन तुकडय़ा सज्ज आहेत. अतापर्यंत इराकमधील दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या शहरांतील 40 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात भारत सरकारला यश आले आहे.

Leave a Comment