‘आयएसआयएस’ दहशतवाद्यांनी केली स्वतंत्र इस्लाम राष्ट्राची घोषणा

terroris
बगदाद : इराक आणि सिरियामधील ताब्यात घेतलेल्या प्रदेशाची स्वतंत्र इस्लाम राष्ट्र म्हणून घोषणा इराकमधील सुन्नी कट्टरपंथीय दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’ने केली असून, नव्या राष्ट्राचा खलिफा म्हणून संघटनेचा म्होरक्या अबू-अल-बगदादी याला घोषित करण्यात आले आहे.

इंटरनेटवर एका व्हिडीओ क्लिपद्वारे ‘आयएसआयएस’चा प्रवक्ता अबू मोहम्मद अल अदनानी याने ही घोषणा केली. नव्या इस्लामी राष्ट्राचे खलिफा संघटनेचे प्रमुख अबू-अल-बगदादी हे आहेत. सुरा कौन्सिलच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे’. या घोषणे बरोबरच नव्या राष्ट्राच्या खलिफांप्रती निष्ठेची शपथ घेऊन त्यांचे समर्थन करण्याचे आवाहन सर्व जेहादी संघटनांना करण्यात आले आहे. अधिकृत दस्तऐवजातून इराक व लेवांट या शब्दांना वगळण्यात आल्याचे अदनानी याने जाहीर केले आहे.

Leave a Comment