व्होल्व्हो कार येणार गुगल अँड्राईडसह

volvo
नवीन जनरेशनच्या व्होल्व्हो कारमध्ये एक्ससी ९० या मॉडेलने पहिली गुगल अँड्राईड ऑटो स्मार्टफोन सिस्टीम असलेली कार बनण्याचा मान मिळविला आहे. व्होल्व्होचे अध्यक्ष सॅम्यूलसन हकन यांनी व्होल्व्होच्या नवीन जनरेशनच्या सर्व कारना ही सिस्टीम बसविली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

माणसाचे दररोजचे जीवन अधिक सुखदायी करण्यासाठी गुगलने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे अधिक लक्ष पुरविले आहे आणि कारसाठी अँड्राईड सिस्टीम हा त्याचाच भाग असल्याचे सांगून हकन म्हणाले की या तंत्रज्ञानामुळे आमच्या ग्राहकांना दोन मुख्य स्मार्टफोन प्लॅटफॉर्मशी थेट संपर्क प्रस्थापित करता येणार आहे. अँड्राईड सिस्टीम असलेल्या कारमालकांना गुगल सर्च, गुगल मॅप्स, प्ले म्युझिक ही फोन बेस्ड सर्व अॅप्लीकेशन व्हॉईस सेवेच्या सहायाने अथवा स्टीअरिंग व्हीलच्या सहाय्याने कार चालविताना वापरता येणार आहेत. नवीन व्होल्व्हो यामुळे युजरला घरी असल्याचा फिल देऊ शकणार आहे.

व्होल्व्हो शिवाय ऑडी, होंडा, ह्युंडाई व जनरल मोटर्स या कंपन्यांनीही गुगल अँड्राईड असलेल्या कार उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असून तसा करार गुगलसोबत केला आहे.