इंडोनेशियाच्या माऊंट सिनाबुंगमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

volcano
जकार्ता – इंडोनेशियाच्या माऊंट सिनाबुंगमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने त्यामधून येणाऱ्या गरम लाव्ह्याच्या ज्वाळा चार हजार मीटरपर्यंत आकाशात पोहचल्या होत्या. मीडियाच्या अहवालानूसार याची माहिती देण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ज्वालामुखीचा उद्रेक रविवारी झाला आणि त्याच्या ज्वाला आकाशात 4 हजार मीटर उंचीपर्यंत गेल्या होत्या.

सुमात्रा बेटामध्ये 400 वर्षापूर्वी विसावलेला ज्वालामुखी सप्टेंबर ते फेब्रुवारीमध्ये थोडा थोडा फुटत होता. त्याच्यामुळे आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू आणि 30 हजार लोक विस्थापित झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत त्या स्थानापासून हजारो लोक निघून गेले आहेत. माऊंट सिनाबुंग इंडोनेशियातील 120 सक्रिय ज्वालामुखींमधला एक आहे.

Leave a Comment