टीम इंडियाचा राहुल द्रविड फलंदाजी सल्लागार

rahul
बंगळूरु – कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली होणा-या इंग्लंड दौ-यात माजी कर्णधार व द वॉल म्हणून प्रसिद्ध राहुल द्रविड फलंदाजी सल्लागाराची भूमिका बजावणार आहे.

द्रविडची या पदी निवड भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सूचना दिल्यानंतर करण्यात आली आहे. द्रविडने याआधी राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

भारत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी२० सामना खेळणार आहे. नऊ जुलैला भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पहिला सामना रंगणार आहे.

२०१२ मध्ये भारताची द वॉल अशी ओळख असणारा राहुल द्रविड आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने आतापर्यंत १६४ कसोटी, ३४४ एकदिवसीय आणि एक टी२० सामना खेळला आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली होती.

Leave a Comment