कोलंबियाने केला उरुग्वेवचा पराभव
रिओ दा जानिरो – फिफा विश्नचषकाच्या बाद फेरीतील सामन्याला सुरुवात झाली असून बाद फेरीतील सामन्यात कोलंबियाने उरुग्वेवर २-० ने विजय मिळवत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबियाने हा विजय मिळवित क्वा२र्टर फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. रविवारी रंगलेल्या स्पर्धेत दोन गोल करणारा जेम्स कोलंबियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
कोलंबिया-उरुग्वे यांच्याजतील सामना सुरु होताच सुरुवातीच्या सत्रात २८ व्या मिनिटाला गोल करण्यात कोलंबियाला पहिले यश मिळाले. उरुग्वेनेही कोलंबियाशी बरोबरी करण्याचे प्रयत्न केले मात्र कोलंबियाने ते सर्व प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सत्रात १-० ने आघाडी राखण्यात कोलंबियाला यश मिळाले. या सामन्याडत उरुग्वे संघाला गोल करण्याडच्याख काही संधी चालून आल्याि होत्यास मात्र त्यांरना गोल करता आला नाही.
दुसरे सत्र सुरु होताच कोलंबियाच्या जेम्सने उरुग्वेला दुसरा धक्का दिला. ५० व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेर शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवण्यात कोलंबियाला यश मिळाले. त्यावमुळे या बाद फेरीच्या लढतीत कोलंबियाने सहजच उरुग्वे संघावर विजय मिळविला.