डोंगराखाली वसलेय सेटेनिल शहर

setenal
इंद्राने वरूणास्त्र सोडल्याने गोवर्धनवासियांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने बोटाच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि गोपगोपींचे रक्षण केल्याची कथा आपल्याला परिचित आहे. स्पेनमध्येही एक असे शहर आहे जे खरोखरची डोंगराखाली म्हणजे अगदी डोंगराच्या पोटात वसलेले आहे. सेटेनिल डी लास बोडेगास असे भलेमोठे नाव असलेले हे शहर प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. या नावाचा अर्थ आहे सातवेळा कांही नाही.

या शहराची वसाहत डोंगराच्या नैसर्गिक गुहांमध्येच आहे आणि येथील लोकसंख्या आहे केवळ तीन हजार. मात्र हे शहर सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण आहे. इतकेच नव्हे तर येथील बार, रेस्टॉरंटस, जागतिक दर्जाची आहेत. येथे वाईन मेकींग, मुरांबे आणि मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि या उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. येथील लोकसंख्येत मोठ्या संख्येने कलाकार आहेत आणि येथील बाजार व कॅफे परदेशी पर्यटकांनी कधीही पाहिले तरी भरून वाहात असतात.

केंडीज प्रांताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या या शहराचे नाव रोमन लॅटिन वाक्यावरून ठेवले गेले आहे. १४८४ साली या शहराचा पाडाव केला गेला होता व तेथील ख्रिश्चन लोकांना घरे सोडण्यासाठी मजबूर केले गेले होते. मात्र तोफखान्याच्या मदतीने या नागरिकांनी १५ दिवस सतत लढाई करून येथील किल्लयावर पुन्हा कब्जा केला असा इतिहास सांगितला जातो.

Leave a Comment