जपानमध्ये बेरोजगारी दरात घसरण

job2
टोकियो- मे महिन्यात जपानमधील बेरोजगारी दरात ३.५ टक्के घट नोंदविली गेली असून याकडे आर्थिक सुधारणांचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. मात्र अर्थविश्लेषकांच्या मते रोजगाराचे स्वरूप अजून स्थिरच असल्याने चिंता कमी झालेली नाही.

विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जपानमध्ये बरोजगारी दरात घट दिसत असली तरी ताप्तुरत्या व पार्टटाईम नोकर्‍यांतील कामगारांची संख्या खूप वाढली आहे. तुलनेने कायम स्वरूपी नोकर्‍यांतील कर्मचार्‍यांच्या संख्येत मामुली वाढ दिसते आहे. गेल्या १ वर्षात ताप्तुरत्या व पार्ट टाईम नोकर्‍यां मिळालेल्या कामगारांची संख्या ३ लाख आहे मात्र कायम स्वरूपी नोकरी मिळालेले केवळ १० हजार कामगारच आहेत. त्यामुळे बरोजगारी दरातील घटीचे जे चित्र दिसते आहे ते फसवे ठरू शकण्याची भीती आहे.

Leave a Comment