मुंबई : मुंबई महापालिकेला देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत गणले जाऊन सुद्धा मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.
श्वानगृहासाठी मुंबई पालिकेकडे उपलब्ध नाही निधी
राज्य शासनाने भटक्या कुत्र्यांसाठी पालघर येथे 18 एकर जागा अल्प किमतीत उपलब्ध करून सुद्धा श्वान गृह चालवणे पालिकेला आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याचे पालिकेने राज्य सरकारला कळवले आहे. आरटीआय कार्यकर्ते कमलाकर दरवडे यानी माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे मुंब्र्यात एका शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर 100 टाके घालण्यात आले आहेत. तर दिल्लीत एका कुत्र्याने लहान मुलीवर हल्ला केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. अशा घटना घडत असताना मुंबईतही भटके कुत्रे आहेत. असे असताना खबरदारी घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमट आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेच्या कारभाराबाबत आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.