सिंगापूर – फेसबुकवर खोटी माहिती टाकल्याप्रकरणी सिंगापूरमधील एका नागरिकाला स्थानिक न्यायालयाने ५ हजार सिंगापूर डॉलरचा (सुमारे अडीच लाख रुपये) दंड ठोठावला आहे. सिंगापूरच्या लिटल इंडिया परिसरात मागील वर्षी झालेल्या दंगलीत ५ सुरक्षा अधिकार्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्याने फेसबुकवर टाकली होती. मात्र त्यानंतर एका व्यक्तीने याची शहानिशा केली असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला हा दंड ठोठविण्यात आला आहे.
फेसबुकवरील पोस्ट महागात ;अडीच लाख मोजावे लागले
डेसमंड लुम मुन हुई असे फेसबुकवर खोटे वृत्त पसरविणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. गतवर्षी झालेल्या दंगलीत तीन पोलीस व दोन संरक्षण अधिकारी ठार झाल्याची माहिती त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर येथील एका नागरिकाने ही पोस्ट फेसबुकवर वाचत तिची शहानिशा केली, मात्र ही माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हुईने सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे तक्रारकर्त्याने न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सिंगापूरमध्ये गतवर्षी ८ डिसेंबर २0१३ रोजी ‘लिटल इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या भागात उसळलेल्या दंगलीत ५४ अधिकारी जखमी तर २३ वाहनांचे नुकसान झाले होते. येथील एका भारतीय कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर ही दंगल उसळली होती. त्यात ४00 दक्षिण आशियाई व्यक्तींचा समावेश होता. यात भारतीय नागरिकांचा जास्त सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.अशी खोट्या माहितीची पोस्ट टाकण्यात आली होती