अंबानी कुटुंबियांचा कलह पण पुस्तकातून चव्हाट्यावर !

ambani
मुंबई: धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबातीला वादाची माहिती पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. पण पुस्तकातून ,हे विशेष!

मुकेश अंबानी आणि धीरूभाई अंबानी यांच्यात नक्की कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले.लेखक आणि पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांच्या ‘गॅस वॉर्स’ या पुस्तकात अंबांनी बंधूंच्या विभाजनाची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी लेखक परंजॉय गुहा म्हणाले, रिलायंसच्या विभाजनाचा वाद हा टीना आणि निता अंबानी यांच्यापेक्षा खूप पुढचा आहे. केवळ याला महिलांच्या वादापुरते मर्यादीत ठेवता येणार नाही. रिलायंसच्या विभाजनाचा प्रभाव भारतीय गॅस उत्पादनासोबतच त्याच्या किमतीवरही झाला. ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला.

परंजॉय यांच्या माहितीनुसार, ‘गॅस वॉर्स’या पुस्तकाच्या निर्मितीनंतर रिलायन्स कंपनीकडून त्यांना नोटीसही देण्यात आली. त्या नोटीसला त्यांनी उत्तरही दिले आहे. रिलायन्सने नक्की नोटीस का पाठवली यामुळे पुस्तकाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.परंजॉय गुहा यांच्या या पुस्तकात रिलायन्सची अशी कोणती रहस्ये आहेत की ज्यामुळे त्यांना रिलायन्सने नोटीस पाठवली आहे. गुहा यांच्या या पुस्तकामुळे औद्योगिक विश्वात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.

Leave a Comment