मध्य रेल्वेच्या प्रशासकीय इमारतीला लागलेली आग विझवण्यात यश

fire
मुंबई – मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील एका प्रशासकीय इमारतीच्या चवथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग लागली होती. ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाडया आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून, आग विझविण्यात यश आले आहे. मात्र, इमारतीमधून धुराचे लोट अद्यापही येत आहेत. आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आगीमुळे कुठलीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेताना सीएसटी स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक 1 बंद ठेवण्यात आला आहे. आग लागलेला परिसर पोलीसांनी तात्काळ रिकामा केला. आग लागलेल्या इमारतीमध्ये चीफ कमर्शीयल ऑफीसर यांच्या कार्यालयासह अन्य कार्यालयेही आहेत. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून, आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment