फोर्ब्सच्या दानशूर यादीत रोहिणी निलकेणी, अजय पीरामल यांच्यासह चार भारतीय

combo1
मुंबई – आशियातील दानशूरांच्या यादीत रोहिणी निलकेणी, अजय पीरामल, गुप्ता बंधू, आशीष धवन या चार भारतीयांना स्थान मिळाले आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील 48 दानशुरांची यांदी फोर्ब्सने जाहीर केली असून, यादीत ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, सिंगापूर, फिलीपाईन्स, दक्षिण कोरीया, तैवान आणि थायलंडच्या दानशुर मंडळींचा समावेश आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, निलकेणी यांनी सामाजिक कार्यासाठी जवळपास 240 कोटी रुपये दान दिले आहेत. त्यांच्या अर्घ्यम या संस्थेच्या माध्यमातून भारतात भूजल संधारण आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. रोहिणी यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ एम्प्लॉइड इकॉनॉमिक रिसर्च सेंटर या संस्थेला 10.2 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योगपती अजय पिरामल यांनी पिरामल फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चार वर्षात 36 कोटी रुपये दान दिले आहेत. फोर्ब्सच्या यादीत असणाऱया भारतीयांमध्ये ते दुसऱया स्थानी आहेत. औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी ल्युपीनचे संस्थापक देश बंधू गुप्ता यांनी आपल्या समाजिक संस्थेला 19.85 कोटी रुपये दान केले असून, आगामी पाच वर्षात 12.03 कोटी रुपये दान देण्याची योजना असल्याचे यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आशिष धवन सेंट्रल स्क्वेअर फाऊंडेशन मार्फत 51 कोटी रुपये दान देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनच स्थापन झालेल्या अशोका विद्यापीठाला त्यांनी 20 कोटी रुपये दान दीले आहेत. धवन यांनी हॉवर्डमधून एमबीए केले असून, ते गोल्डमॅन साक्सचे माजी बँकर राहिले आहेत.

Leave a Comment