पहिल्या जागतिक युद्धाच्या शताब्दीनिमित्त जमणार बडे नेते

war
ब्रुसेल्स – जागतिक महायुद्धात लढलेल्यांत सर्वसामान्य नागरिकांचे नातेवाईक जसे होते तसेच युरोपिय देशातील नेत्यांच्या नातेवाईकांनी, जवळच्या आप्तांनीही आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून, रशियाचे पुतीन, जर्मनीच्या अँजेला मर्केल व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा समावेश आहे. यंदा पहिल्या जागतिक युद्धाची शताब्दी साजरी होत असून त्या कार्यक्रमासाठी युरोपिय देशातील अनेक राष्ट्रप्रमुख एकत्र जमणार आहेत. या नेत्यांसाठी जागतिक युद्धाच्या आठवणी अभिमानास्पद असल्या तरी कुटुंबातील कोणी ना कोणी धारातीर्थी पडल्यामुळे या अभिमानाला दुःखाची एक किनारही आहे.

बेल्जियमच्या या शहरात र्फंडलर्स युद्धभूमीवर युरोपियन युनियन मधील २८ देशांचे नेते युद्धाचा १०० वा वाढदिवसासाठी जमत असून येथेच युद्धाची सुरवात झाली होती. मृत्यू आणि विनाशाचे थैमान युरोप खंडावर माजले होते. हे युद्ध म्हणजे केवळ इतिहासातील मोठी लढाई नाही तर युद्धात वीरमरण आलेल्यांच्या कुटुंबियांची ती कहाणी आहे. या युद्धात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे आजोबा स्पिरीडीन पुतीन शेफ म्हणून सामील झाले होते तर ब्रिटीश पंतप्रधान कॅमेरून यांच्या घरातील तीन जण युद्ध लढताना धारातीर्थी पडले होते.जर्मन चॅन्सलेर अँजेल मर्केल यांच्या आजोबांची करणी कांहीशी गुढतेचे वलय असलेली होती.

६ कोटी ५० लाखाहून अधिक सैनिकांच्या या युद्धासाठी हालचाली केल्या गेल्या होत्या त्यात या नेत्यांचे नातेवाईकही सामील होते.

Leave a Comment