मुंबई – कामगारमंत्रिपदाचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे, तर जलसंपदा हे महत्त्वाचे मंत्रिपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे. राज्यपाल के. शंकरनारायण यांनी काल भास्कर जाधव यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
भास्करराव कामगार, तर हसन मुश्रीफ जलसंपदा सांभाळणार
सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्यामुळे त्यांच्याकडे असलेला जलसंपदा विभाग जाधव यांना देण्यात येणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगत होती. मात्र, अचानक यात बदल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेले कामगारमंत्रिपद जाधव यांना देण्यात आले.
तटकरे यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी जाधव सरकारमध्ये राज्यमंत्री होते. मात्र, 2013 साली त्यांना वगळण्यात आले होते.