पल्यासारख्या लोकांना व्यापारी किंवा कारखानदारीचा पेशा जमणार नाही, ते काही आपले काम नाही असे उत्तर मिळते. कारण आपल्याकडे भांडवल नसते आणि भांडवल नसल्यामुळे आपण धंदा करू शकत नाही. या उत्तरातून आणि प्रतिक्रियेतून भांडवल ही धंद्याची गरज आहे असा गैरसमज लोकांच्या मनात आहे हे लक्षात येते. सकृतदर्शनी हे म्हणणे बरोबर आहे. कारण एखादा धंदा, व्यापार किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर यंत्रसामुग्री लागते, जागा लागते, दुकान लागते. निरनिराळ्या साधने खरेदी करावी लागतात आणि मग असे आहे तर या सगळ्या गोष्टी पैशाशिवाय कशा मिळणार? म्हणजेच खिशात पैसा असल्याशिवाय धंदा करणे शक्य नाही. भांडवलाशिवाय व्यवसाय निघणे शक्य नाही. लोकांच्या या म्हणण्यात फार मोठी चूक आहे असे काही नाही. पण आपण भांडवलाशिवाय धंदा शक्यच नाही का? याचा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की, प्रत्येक व्यवसाय वेगळा असतो आणि बरेच व्यवसाय भांडवलाशिवाय सुरू करता येतात.
बिनभांडवली उद्योग
अशा बिनभांडवली उद्योगांची संख्या प्रचंड आहे. पण आपण त्या दृष्टीने आपल्या आसपास कधी पाहिलेले नसते. थोडे सूक्ष्मपणे निरीक्षण केले की आपल्याला सुद्धा भांडवला शिवाय उभारता येणारे अनेक व्यवसाय दिसायला लागतात. आपल्या देशात टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे अनेक उद्योगपती आहेत. महाराष्ट्रात सुद्धा किर्लोस्कर, शिर्के, गरवारे असे अनेक मराठी उद्योगपती आहेत. या सगळ्या उद्योगपतींनी आपली उद्योगाची साम्राज्ये कशी उभी केली याचा इतिहास पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की, यातल्या कोणत्याही उद्योग समूहाचे संस्थापक हे पैसेवाले नव्हते. अतीशय सामान्य स्थितीतून त्यांनी स्वत:जवळ भांडवल नसताना मोठ्या हिकमतीने आपले व्यवसाय उभे केले आहेत. त्यांच्या चरित्रांकडे पाहिल्यानंतर उद्योगाला भांडवल लागते हा गैरसमज दूर होतो. टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा हे गुजरातेतील राहणारे होते आणि त्यांचा व्यवसाय पारशी समाजाच्या अग्यारीचे पुजारीपण हा होता. पण त्यांनी जवळपास नगण्य भांडवलामध्ये मुंबईत येऊन उद्योग उभा केला आणि तो वाढवला. अंबानी उद्योग समूहाचे संस्थापक धिरुभाई अंबानी हे तर लंडनमध्ये पेट्रोल पंपावरचे कारकून होते.
किर्लोस्कर, गरवारे, शिर्के हे सगळे उद्योगपती मध्यमवर्गीय आणि खाऊन-पिऊन सुखी असणारे लोक नव्हते. यातल्या काही जणांना तर दोनवेळच्या ेजेवणाची सुद्धा भ्रांत होती. पण अशाही अवस्थेत त्यांच्या मनात प्रचंड जिद्द होती आणि तेच त्यांचे भांडवल होते आणि त्यावरच त्यांनी आपली साम्राज्ये उभी केली. किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव आणि रामभाऊ हे उद्योग समूह स्थापन करण्याच्या आधी सायकल चालवायला शिकविण्याचे वर्ग घेत होते. पण त्यातून त्यांनी पुढे वाटचाल केली आणि किर्लोस्कर उद्योग समूह निर्माण केला. बी.जी. शिर्के यांचे वडील अल्पवयातच मरण पावले होते आणि त्यांची आई गावाकडची शेती कशीबशी सांभाळत होती. परंतु त्याही अवस्थेतून बी. जे. शिर्के यांनी केवळ आपल्या संवाद कौशल्याच्या आणि जनसंपर्काच्या हातोटीच्या जोरावर मोठे साम्राज्य उभे केले.
Mast
आपण मला कशापकारे मदत करु शकता. मी जाँब करून आल्यावर घरी बसुन मी आणि माझी पत्नी काय करू शकतो.
आज नवीन शिकायला भेटल
माझा पेपर ला धनवाद