प्रस्तावित टोलनाक्याच्या विरोधात शिवसेनेचा रास्तारोको

toll-plaza
मुंबई – आज शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली खारघर मधील प्रस्तावित टोल नाक्याच्या विरोधात रस्त्यावर उतरली. खारघर जवळ सायन पनवेल महामार्गावर शिवसैनिकांनी आज रास्ता रोको केला.यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शिवसेनेने खारघर मधील या प्रस्तावित टोल नाक्याला जोरदार विरोध केला आहे. हजारो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले होते. हा टोल नाका रद्द करण्यात यावा अशी शिवसेनेने मागणी केली आहे.

खारघर मधील हा टोलनाका अन्यायकारक असून तो न हटवल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचाही इशारा शिवसेनेने दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खासदार श्रीरंग बारणेसह बाराशे शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment