नायजेरियाच्या राजधानीत बॉम्बस्फोट, २१ ठार

bomb
अबुजा – नायजेरियाची राजधानी असलेल्या अबुजा येथील ईएमएबी प्लाझा मॉलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटता 21 जण ठार, तर 17 जण जखमी झाले.

नायजेरियाच्या राष्ट्रीय सूचना केंद्राचे समन्वयक यांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी शॉपिंग मॉलच्या प्रवेशद्वारावर इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस (आयइडी) लावल्याने हा स्फोट झाला. यात 21 जण ठार झाले. सुरक्षा दलाने एका संशयित हल्लेखोराला ठार केले, तर अन्य एकाला अटक केली आहे.

Leave a Comment